बारामती लोकसभा मतदार संघातील टपाली मतदानाचे वेळापत्रक जाहीर
बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी निवडणूक जाहीर झाली असून भारत निवडणूक आयोगाने केवळ अत्यावश्यक सेवेत मतदानाच्या दिवशी कार्यरत असल्यामुळे मतदान न करू शकणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक, तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा, तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे (एफसी) स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघातील या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय वेळापत्रक खालीलप्रमाणे
मतदारसंघ – घरी जाऊन मत नोंदवणे – टपाली मतदान केंद्र (पीव्हीसी) – मतदान सुविधा केंद्र (एफसी)
दौंड – १ ते ३ मे – १ ते ३ मे – ४ ते ६ मे
इंदापूर – ३० एप्रिल ते १ मे – २ ते ४ मे – २ ते ६ मे
बारामती – १ ते २ मे – १ ते ३ मे – ४ ते ६ मे
पुरंदर – २ ते ३ मे – १ ते ३ मे – ४ ते ६ मे
भोर – २ ते ४ मे – १ ते २ मे – ३ ते ६ मे
खडकवासला – १ ते २ मे – २९ एप्रिल ते १ मे – २ ते ६ मे