जिल्हास्तरीय स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा भोंगवलीचे यश; धावती उंच उडी स्पर्धेत अमोल थोर पुणे जिल्ह्यात प्रथम
भोर प्रतिनिधी : विठ्ठल पवार
यशवंतराव कला क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत बालेवाडी येथे २९ जानेवारी रोजी झालेल्या धावती उंच उडी स्पर्धेत कु. अमोल रघुनाथ थोर (इयत्ता सातवी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंगवली याने पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या कामगिरीत मोलाचा सहभाग असणारे मार्गदर्शक शिक्षक, शहाजी खरात, वर्गशिक्षक ज्ञानेश्वर थोरवे, मुख्याध्यापक पि. डी जगताप. सहशिक्षक मोरे सर उपस्थित होते.

तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल गायकवाड व सदस्य नितीन लंके, अर्चना शिरगावकर, सोनाली भांडे, पूजा सुर्वे, अमृता ताठे, शितल सुर्वे, अविनाश पवार, सुप्रिया ताठे, प्रसाद भांडे, राजेंद्र सुर्वे, स्वाती गायकवाड, स्वाती खुटवड, भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार, उपसरपंच रेखा जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत भोर ,वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते कुमार अमोल थोर याचा सत्कार करण्यात आला. भोर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेच्या कार्याध्यक्ष प्रभावती कोठावळे कदम मॅडम यांनी कौतुक करत अभिनंदन केले.