वायर तुटल्याने क्रेन विहिरीत कोसळून एक ठार तर एक गंभीर जखमी; भोर तालुक्यातील कोळवडी येथील दुर्घटना

नसरापूर : नसरापूर-राजगड रोडवर असणाऱ्या कोळवडी (ता. भोर) येथे जलजीवन योजनेतील विहिरीचे खोदकाम सुरू असताना वायर रोप तुटल्याने क्रेन विहिरीत पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सोमवारी(दि. २९ एप्रिल) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या मध्ये अंकुश प्रभाकर गेडाम(वय २३ वर्ष, रा. गडचिरोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून विजेंद्र रामानंद भारद्वाज(वय ४९ वर्ष, रा. उत्तरप्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या पुरुषाचे नाव आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, नसरापूर-राजगड रोडलगत असणाऱ्या कोळवडी गावातील ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. आज सोमवारी दुपारच्या जेवणानंतर क्रेनच्या साहाय्याने बकेटमधून कामगारांना दरवेळेस प्रमाणे खाली सोडण्यात येत असताना अचानक क्रेनची वायर रोप तुटली. त्यामुळे तब्बल ५० फूट खाली बकेट पडले. वायर रोपचे लोखंडी हुक तुटल्याने हा अपघात झाला असून या बकेट मध्ये असणाऱ्या कामगारां मध्ये असणारे अंकुश गेडाम हे जागीच ठार झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलवून जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले असून इतर कामगारांना दुसऱ्या क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page