BIG BREAKING : भोर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; रांझेतील तलाठी रंगेहाथ जाळ्यात

भोर : रांझे(ता.भोर) येथील तलाठी सुधीर दत्तात्रय तेलंग(वय ५६ वर्ष) यांना आज बुधवारी(दि. २१ ऑगस्ट) दुपारी लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या काही दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी रांझे गावात काही २० गुंठे जागा खरेदी केली होती. तक्रारदार यांच्या जागेची नोंद ग्राह्य धरण्यासाठी व सातबारा उता-यावर नोंद घालण्यासाठी तलाठी तेलंग यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक गुंठ्यात एक हजार अशी २० हजार रुपयांची मागणी केली होती.

Advertisement

दर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सुधीर तेलंग यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, सदर रक्कम तेलंग यांनी पंचासमक्ष स्विकारली असता, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page