सारोळा येथील निरा नदी पात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह
सारोळा : पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा(ता. भोर) गावच्या हद्दीत असलेल्या नीरा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना गुरुवारी(दि. ९ मे) रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहिती नुसार, सारोळा(ता. भोर) येथील वैकुंठ स्मशानभूमीच्या मागील बाजूस असणाऱ्या निरा नदी पात्रातील जॅकवेल जवळ हा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचे अंदाजे वय ४० वर्ष ते ४५ वर्ष असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या व्यक्तीच्या अंगात पिवळ्या रंगाचा हाफ शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट दिसत असुन त्याच्या डाव्या हातात घड्याळ व उजवे हातात पिवळे धातुची आंगठी दिसत आहे. ही घटना गुरुवारी(दि. ९ मे) रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून राजगड पोलीसांना देण्यात आल्यानंतर त्वरित राजगड पोलिस घटनस्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही राजगड पोलिसांनी सुरु केली आहे. तसेच परिसरात या वयोगटातील कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन राजगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.