शिवाराच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार; कामथडी येथील चौघे जण राजगड पोलिसांच्या ताब्यात

नसरापूर : शिवारातील बांध कोरल्याच्या वादातून कोयत्याने वार करणाऱ्या कामथडी(ता. भोर) येथील चार जणांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून राजगड पोलिसांनी याप्रकरणी महेश दिवाणजी इंगुळकर, सचिन दिवाणजी इंगुळकर, दत्तात्रय मारुती इंगुळकर, सागर मारुती इंगुळकर(सर्व राहणार कामथडी, ता. भोर) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत जखमी चंद्रशेखर शिवाजी इंगुळकर(वय ३५ वर्ष, रा. कामथडी, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखर इंगुळकर हे १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास त्यांच्या कामथडी येथील शिवारात उसाला पाणी देत असताना संशयित आरोपी सचिन इंगुळकर याने “तुम्ही आमचा बांध का कोरला?” असे म्हणून शिवारात असणाऱ्या फिर्यादी यांच्या वडिलांस शिव्या देण्यास सुरुवात केली. यावर फिर्यादी यांनी शिव्या देऊ नको असे म्हणताच सचिन इंगुळकर व त्याच्या बरोबर असणाऱ्या महेश इंगुळकर, दत्तात्रय इंगुळकर आणि सागर इंगुळकर यांनी फिर्यादी यांना कोयत्याने डोक्यात वार करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दि. २० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास राजगडाचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. या दरम्यान मंगळवारी(दि. २३ एप्रिल) फिर्यादी जखमी झाल्या बद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र राजगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमात भा.द.वी. कलम ३०७ हे वाढवण्यात आले. यांनतर राजगड पोलिसांनी लगेचच वरील सर्वांना ताब्यात घेतले आहे. आज बुधवारी(दि. २४ एप्रिल) सर्वांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page