निनाद महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा दणका : तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केलेल्या चार जणांवर अखेर गुन्हा दाखल; राजगड तालुक्यात जमिनीच्या वादातून घडलेला प्रकार
राजगड : राजगड(वेल्हे) तालुक्यातील कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून २२ वर्षीय मुलीला चार जणांकडून जेसीबीच्या साह्याने जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटने नंतर लगेचच निनाद महाराष्ट्र न्यूजने प्रथम बातमी माध्यमांवर दाखवली. याची दखल घेत वेल्हे पोलिसांनी अखेर चार जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर शिवीगाळ धमकी व खूणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
राजगड तालुक्यातील कोंडावळे गावातील घटना घडलेल्या ठिकाणची जमीन ही न्यायप्रविष्ठ असल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. २००६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन केलेल्या जागेचा मोबदला मिळालेला नाही. या जमिनीचा जमिनीचा दावा न्यायप्रविष्ठ असताना बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी हे चौघेजण आले होते. असा आरोप या तरुणीने व तिच्या आईने केला असून ट्रॅक्टर आणि जेसीबी च्य साह्याने १५ ते २० जण ताबा घेण्यासाठी आले होते.
त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणीला जेसीबीच्या साह्याने अंगावर माती टाकून गाडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वरील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेतील जेसीबी व ट्रॅक्टर जप्त केले आहेत.