मनुस्मृती चा पाठ्यपुस्तकात समावेशाच्या निषेधार्थ खेड-शिवापुर टोलनाका येथे शिक्षणमंत्री केसरकरांच्या प्रतिमेचे दहन

खेड-शिवापुर :  महाराष्ट्र शासन इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृति चा समावेश करत असल्याचा निषेध करत आज खेड शिवापुर टोलनाका येथे भोर, राजगड, हवेली तालुक्यातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रतिमेचे व मनुस्मृतीच्या प्रतिंचे दहन करण्यात आले. संविधानिक मार्गाने जाहीर निषेध करण्यासाठी आज खेड शिवापुर येथे भिमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

भीम आर्मीचे भोर तालुका प्रमुख महेंद्र साळुंके, रिपब्लिकन सेना भोर तालुकाध्यक्ष किशोर आमोलिक, वंचित बहुजन आघाडी वेल्हे तालुकाध्यक्ष विनोद गायकवाड, किकवीचे सरपंच नवनाथ कदम, सत्यशोधक बहुजन आघाडी भोर तालुकाध्यक्ष आनंद खुडे, आर पी आय आठवले गट युवक जिल्हा अध्यक्ष प्रविण ओव्हाळ, भोर तालुका युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत, वंचित बहुजन आघाडी युवाअध्यक्ष संतोष वैराट, सागर जगताप, सुनिल कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

यावेळी शासनाचा जातीयवादी सरकार उल्लेख करत निषेध करण्यात आला डॉ. आंबेडकर विजयाच्या घोषणा देत शासनाच्या निषेधार्थ शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रतिमेचे तसेच मनुस्मृती पत्रकाचे दहन करण्यात आले. यावेळी बोलताना अमोलिक म्हणाले कि, हे जातिवादी सरकार आमच्यावर मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही हे होऊ देणार नाही. जिल्हा युवक अध्यक्ष प्रविण ओव्हाळ यांनी भुमिका मांडताना सांगितले कि, निव्वल शिक्षणमंत्री केसरकरांच्या मनात आल्याने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होतो आहे आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही व गप्प बसणार नाही मुख्यमंत्री यांनी या बाबत लक्ष घालुन यावर त्वरीत भुमिका घ्यावी आमची भाजपा शिवसेने बरोबर युती असलीतरी ती राजकीय युती आहे वैचारीक नाही हे लक्षात घ्यावे असे अवाहन करुन त्यांनी या आंदोलनास सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थिती लावली त्या बद्दल त्यांचे अभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page