गंगापूजनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून किरण दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील वर्वे येथे ‘रंगला खेळ पैठणीचा’!
नसरापूर : महिला भगिनींच्या अडीअडचणीत हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आज शनिवारी(ता. १५ जून) भोर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या शिवनेरी मंगल कार्यालय(वर्वे, ता. भोर) येथे “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला. उत्साह, चैतन्य, स्पर्धा, धमाल आणि आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणाऱ्या या कार्यक्रमास खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी या देखील उपस्थित होत्या.
यादरम्यान किरण दगडे यांनी काशी यात्रा घडविलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत सामूहिक गंगापूजन कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने पार पडला. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून महिलांना सुखकारक दिलासा देणारा हा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात महिलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळाला विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होत स्वतःला सिद्ध केले. यावेळी पूनम सुरज मिसाळ(वर्वे बु., ता.भोर), वैशाली संजय फाटक(पानवळ, ता.भोर), संगीता श्रीकांत कुरुडकर, अंकिता श्रीकांत भोरडे(वर्वे खु., ता.भोर) या भगिनी मोठ्या बक्षीसांच्या मानकरी ठरल्या.
तसेच या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेला देखील उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू मिळाल्या. क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी उत्कृष्ट सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, राजगड(वेल्हे) तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गरुड, जिल्हाउपाध्यक्ष विनायक ठोंबरे, भोर युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, भोर शहर अध्यक्ष सचिन कन्हेरकर, विनोद चौधरी, महिला अध्यक्ष भोर आशाताई शिवतरे, राजगड(वेल्हे) युवा मोर्चा अध्यक्ष मेघराज हनमघर, राजेंद्रजी मोरे तसेच बहुसंख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व उपस्थित होते.