आपटी येथील महाविद्यालयाच्या इमारतीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त
भोर : भोर एज्युकेशन सोसायटीच्या आपटी(ता. भोर) येथील माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धर्मादाय निधीतून ५० हजार रुपयांचा धनादेश तज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांच्याहस्ते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. घोडके मॅडम, वाडकर सर, कदम सर व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आला. विद्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून बँकेचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सोमनाथ सोमाणी, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, पाले गावचे उपसरपंच राजेश खोपडे, आपटी गावचे जेष्ठ जानु पारठे, विकास सोसायटीचे मा. चेअरमन जगन्नाथ पारठे, मा. सरपंच रघुनाथ पारठे, आबा पारठे, सुनील पारठे, बाळासाहेब गाडे, यशवंत आलगुडे, बँक विकास अधिकारी शामराव घोणे, बँकेचे शाखा व्यवस्थापक मोरे साहेब, अमित गावडे, हर्षल गाडे आदी बँक कर्मचारी, सोसायटीचे सचिव शंकर भोजने, विठ्ठल पारठे, विजय किंद्रे आणि स्वप्नील दळवी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.