अखेर विजय शिवतारे यांचे बंड थंड; शिंदे, फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी अपक्ष खासदारकी लढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या. शिवतारेंच्या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा तिढा निर्माण झाला होता. पण विजय शिवतारे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी शिवतारेंची समजूत काढण्यात तिन्ही नेत्यांना यश आल्याचं म्हटलं जात आहे.

Advertisement

विजय शिवतारे यांचे बंड थंड केलं असून रात्री वर्षावर झालेल्या बैठकीत शिवतारे यांची नाराजी दूर झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांची समजूत घालत त्यांची नाराजी दूर केली. पंतप्रधान मोदींच्या ४०० पारच्या मोहिमेत अडथळा आणू नका असं म्हणत तिघांनी समजावल्याची माहिती समोर येत आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे शरद पवारांची खेळी यशस्वी होतेय आणि याचा फटका महायुतीला होतो असं शिवतारेंना सांगण्यात आल्याची माहिती समजते.

अजित पवारांना विरोध म्हणजेच शरद पवारांची खेळी यशस्वी होत आहे. यामुळे महायुतीचे नुकसान होत आहे. सर्वांमध्ये मतभेद आहेत, पण वचपा काढण्याची ही वेळ नाही अशा शब्दात विजय शिवतारेंची समजूत काढण्यात आली. महायुतीची बैठक आता होणार असून या बैठकीनंतर विजय शिवतारे यांची पत्रकार परीषद होणार असून या पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित राहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page