जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरवळ येथील एच. बी फुलर कंपनीने सारोळे येथे पार पडला वृक्षारोपणाचा कार्यक्रम
सारोळे : जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी अनेक देशांचा सहभाग असतो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे तसेच आपल्या जबाबदारीची आपल्याला जाणीव आणि दृष्टीकोन देतो. या दिवशी पुढील जीवनातील परिस्तिथी किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो.
या दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासत खंडाळा तालुक्यातील शिरवळ एम. आय. डी. सी. मधील नामांकीत एच. बी फुलर या कंपनीने सारोळे(ता.भोर) गावाला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५० झाडे भेट दिली. यामध्ये सिताफळ, वड, पिंपळ, पिपरण इत्यादी झाडांचे प्रकार समाविष्ट आहेत. हा उपक्रम राबवण्यात कंपनीचे प्लॅन्ट हेड योगेश खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत कुलकर्णी आणि अश्विनी देवांगन यांचे सहकार्य लाभले. ही सर्व झाडे सारोळे स्मशानभूमी येथे लावण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व वृक्षारोपण स्वतः कंपनीतील कर्मचाऱ्यांनी येऊन केले. या उपक्रमासाठी सारोळे गावातील सामजिक कार्यकर्ते शेखर पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सारोळे गावातील साईनाथ धाडवे, झुंझार धाडवे, काळुराम महांगरे, महेश धाडवे, सुधाकर धाडवे, बाळासो पांगारे व ग्रामस्थांनी उपस्थित राहून झाडे लावण्यासाठी सहकार्य केले.