राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय भोर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

भोर : भोर तालुका प्रहार अपंग क्रांती संघटना आणि हर्ष फाउंडेशन यांच्या सहकार्याने माननीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय भोर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेषतः तीन दिव्यांग बांधवांनी या प्रसंगी रक्तदान केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.पांडुरंग दोडके, औंध हॉस्पिटलचे फिजिओथेरपिस्ट डॉ. संदीप चौधरी, डॉ. अतुल टाकसाळकर, डॉ. आशिष बुरांडे, सह्याद्री फोर्स अध्यक्ष सचिन देशमुख हर्ष फाउंडेशनचे आप्पासाहेब घोरपडे, माझेरी गावचे सरपंच बाबू दिघे, अपंग क्रांती प्रहार संघटना भोर तालुका अध्यक्ष बाप्पू कुडले, प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य असेच तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विलास मादगुडे महिला अध्यक्ष मनिषा ताई गायकवाड, समाजीक कार्यकर्ते राहुल दगडे, माऊली बदक, रोहन भोसले, योगेश शेलार, मनीषाताई राजीवडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी भोर येथील मॉन्टेक टेक सर्व्हिसेस कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचा रोपवाटिका देऊन जाहीर सत्कार केला. यावेळी अभिषेक आवारे, विनय पलंगे, नम्रता वालगुडे, प्रगती चव्हाण, पूनम पोळ, प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र सोणवणे, सचिव शांताराम खाटपे, संपर्कप्रमुख भानुदास दुधाने, सरचिटणीस पांडुरंग दिघे, मार्गदर्श राजकुमार मोरे, विभाग प्रमुख बापू धोंडे, राजेंद्र गव्हाणे, शिवाजी बदक, नितीन पवार, महिला उपाध्यक्ष संगीता शिवतरे, राणीताई शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page