भोर शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा कुणाल धुमाळ
भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोर शहर युवक अध्यक्ष पदी पुन्हा एकदा कुणाल धुमाळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीपजी गारटकर तसेच पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र धुमाळ यांना देण्यात आले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने आगामी होणा-या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांकरिता कुणाल धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच निवड केल्यानंतर धुमाळ यांचे भोर शहरातील कार्यकर्त्यांद्वारे अभिनंदन केले जात आहे.
यावेळी भोर शहरातील युवकांची संघटना बळकट करून अजित पवार यांच्या मागे ठाम उभी करणार असून तसेच भोर मधील विद्यार्थी व युवक यांचे प्रश्न व अडचणी पक्ष श्रेष्ठी पर्यंत पोहचून त्यांची कामे मार्गी लावणार असल्याचे मत कुणाल धुमाळ यांनी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात भव्य रोजगार मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी तालुक्यातील संतोषजी घोरपडे, भालचंद्रभाऊ जगताप, रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, सुनील भेलके, भोर शहर चे अध्यक्ष केदार देशपांडे, उपाध्यक्ष विशाल तुंगुतकर, पोपट तारू, अतुल काकडे, बाळासाहेब शेटे आदि मान्यवर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.