नीरेतील विवाहितेची आत्महत्या; संतप्त नातेवाईकांनी बाजारपेठेत सासरच्या घरासमोरच केला अंत्यविधी

पुरंदर : नीरा येथील विवाहिता निकीता घुले (वय २७) हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, ही घटना घडल्याचे समजताच रविवारी दुपारी तत्काळ तिला लोणंदमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले

त्यानंतर संतप्त युवकांनी नीरेच्या भर बाजारपेठेतील घुले यांच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याची भूमिका घेतली. परिसरातील जेष्ठांनी युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

परंतु युवकांनी घुले यांच्या राहत्या घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात निकिता यांचा अंत्यविधी केला. रात्री साडेदहाच्या सुमारास नीरेच्या भर बाजारपेठेत ही घटना घडल्याने शहरात भितीचे वातावरण होते. या प्रकरणी लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर बबन सावंत (वय ५०, रा. वाघळवाडी, ता. बारामती) यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली.

माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निकिताच्या लग्नानंतर चार ते पाच महीने झाले नंतर सासु सुवर्णा किशोर घुले, नणंद पुजा किशोर घुले व आरती किशोर घुले ह्या तिला खर्चासाठी पैसे देत नसायच्या व तिस तुझे बापाचे घरुन महीना दहा हजार रुपये घेवुन ये नाहीतर तुझे तु बापाचे घरी जावुन रहा, असे वेळो वेळी म्हणाल्या मुळे मुलगी निकीता हि त्यावेळी आमचे घरी येवुन पंधरा दिवस व महीनाभर येवुन राहत होती, दरम्यान तिचे सासुचे निकीताचे आई वडील व घरच्यांना फोन यायचे व तिला तिकडेच ठेवा. ति औदसा आमचे घरी आल्यापासुन आमचे घराचे वाटोळे झाले आहे. असे म्हणुन शिवीगाळ करत व तिला जर नांदायला पाठवायचे असेल तर दर महीना दहा हजार रुपये खर्चासाठी देत जा.

Advertisement

२०२२ चे दिवाळीमध्ये निकिता पायी चालत आमचे घरी आली होती त्यावेळी आम्ही तिस विचारपुस करता तिने सासु व दोन नंदा या तिला लग्नाचे पहील्या दिवाळीला तुझे आई- बापाकडुन जावई चैतन्यला एक तोळयाची सोन्याची अंगठी करायला सांग व चांगला पोशाख करायला सांग आम्ही घुले पाटील आहोत. असे म्हणाले नंतर मुलगी निकीता हिने त्यांना माझे आई-वडीलांची परस्थीती चांगली नाही. असे त्यांना सांगीतले होते त्यावर त्यांनी मुलगी निकीता हिस पती चैतन्य, सासु सुवर्णा किशोर घुले, नणंद पुजा किशोर घुले, आरती किशोर घुले यांनी तिस हाताने लाथा बुक्यानी मारहाण करुन शिवीगाळ करुन अंगठी घेवुन दिवाळीचा मानपान करायला सांग. असे वारंवार छळ करत असल्याचे फिर्यादीत म्हणटले आहे.

दरम्यान निकिता घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर वाघळवाडीच्या सावंत कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रीया उमटली. युवकांनी घुले यांच्या घरासमोरच अंत्यविधीची भूमिका घेतली. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने घुले कुटुंबातील युवकांना जेजुरी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page