भोर बस स्थानकात एसटी खाली चिरडल्याने एकाचा मृत्यू
भोर : भोर बस स्थानकात एसटी बसने ठोकर देऊन बसने चिरडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी(दि.१५ जुलै) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
बस स्थानकात जात असताना एसटी बसणे ठोकर देत एसटीचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेले. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रुपेश गायकवाड असुन तो पोलादपूर जिल्हा रायगड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.