खेड शिवापूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
खेड शिवापूर : खेड शिवापूर परिसरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तसेच भीमसैनिकांनी घटनेचे शिल्पकार, संविधान समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोगत व्यक्त करीत संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे, कार्यक्रमाचे आयोजक आरपीआयचे (आठवले गट) पुणे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष प्रवीण ओव्हाळ, निवेदक विठ्ठल पवार, भिम आर्मी भोर विधानसभा अध्यक्ष महेंद्र साळुंके, भिमआर्मी भोर तालुका उपाध्यक्ष सागर जगताप, अविनाश गायकवाड, अरूण रणखांबे अमोल गायकवाड, कुंदन गंगावणे, अमोल कोंडे, त्र्यंबक मोकाशी, जितेंद्र कोंडे, संग्राम कोंडे, उमेश कांबळे, विशाल शेलार, अभयसिंह कोंडे, नाना धोंडे तसेच राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप, आदींसह भोर, हवेलीतील भीमसैनिक उपस्थित होते.