पुणे सातारा महामार्गावरील खंडाळा येथे ३ तास झाले तरी रास्ता रोको सुरूच; हजारो गाड्या व लाखो प्रवाशांचे हाल,
खंडाळा : अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन आज शुक्रवार (दि.१ डिसेंबर) दुपारी सुरू करण्यात आले आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे हायवे वर ट्रॅफिकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तीन तास झाले खंडाळा येथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. हजारो गाड्या अन त्यातील लाखो प्रवासी या आंदोलनामुळे अडकून पडले आहेत.