भोर तालुक्यातील ९१ गावातील महसुल रेकॉर्ड जळीत प्रकरणी सकल मराठा समाज भोर यांनी अंतरवली सराटीत जाऊन घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
भोर : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी(ता.अंबड) येथे अमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सोमावरी(दि.१९ फेब्रुवारी) दहा दिवस पूर्ण झाले.
सकल मराठा समाज भोर तालुका यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून उपोषण स्थळी अंतरवली सराटी येथे उपोषणाच्या दहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली. या भेटी मध्ये भोर तालुक्यातील मराठा समाजाच्या समोरील अडचणी त्याच बरोबर ९१ गावातील महसुल विभागातील रेकॉर्ड जळीत प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जरांगे पाटील यांना सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भेलके यांनी विनंती केली. यावर मार्ग काढण्यासाठी सुमारे १ तास चाललेल्या चर्चेत लवकरच मिटींग घेऊन भोर तालुक्यातील सर्व ९१ गावातील लोकांना दिलासा दायक मार्ग काढण्याचे आश्वासन यावेळेस सकल मराठा समाज भोर यांना जरांगे पाटील यांच्या वतीने देण्यात आले.