पत्नी, मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोर तालुक्यातील पतीस दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड

भोर : सासरच्या जाचाला कंटाळून पत्नीने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणात न्यायालयाने पतीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संतोष ऊर्फ नाना सुधाकर शिळीमकर(रा. वीरवाडी, ता. भोर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

Advertisement

जिल्हा न्यायाधीश ए. आय. पेरमपेल्ली यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. १६ जुलै २०१२ रोजी वीरवाडी येथे ही घटना घडली होती. योगिता संतोष शिळीमकर(वय २५ वर्ष) यांनी आपली मुलगी समृद्धी हिला घेऊन कुंबळजाई मंदिराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर, योगिता हिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष याला अटक करण्यात आली. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप गेहलोत यांनी पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. आई, भाऊ व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page