सारोळा येथून घरासमोरून दुचाकीची चोरी
सारोळा :-
(ता.भोर) येथील ॲड. नानासाहेब धाडवे (वय ५४) रा.सारोळा ता. भोर यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या न विरोधात राजगड पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि. कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे ॲड. धाडवे यांच्या राहत्या घरा समोरून अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेली. गुरुवार ता.५ रात्री घरासमोर हॅण्डल लॉक करून ठेवलेली यमाहा कंपनीची आर एक्स १००, एम. एच. १२ व्ही. ३८३९ हि मोटार सायकल अंदाजे किंमत २० हजार रुपये ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
पंचक्रोशीत वकिलांची गाडी म्हणून या गाडीची कमालीची ओळख होती. याबाबत परिसरातील सीसीटीव्ही मध्ये पाहणी केली असता, एक अज्ञात मोटारसायकल वरून आलेले तीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसत आहे. याबाबत तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक गणेश लडकत पुढील तपास करत आहेत.