भोर विधानसभेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणार : तालुका प्रमुख माऊली शिंदे. कापुरव्होळ येथे शिवसेना उबाठा पदाधिकारयांचा मेळावा संपन्न
कापुरव्होळ : आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापूरहोळ(ता.भोर) येथील वैभवी हॉटेल येथे उ.बा.ठा. शिवसेना भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी(दि. २३ जून) पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील शिवसैनिक, युवासैनिक, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण ज्या मातीत बांधले त्या भोर विधानसभेवर शिवसेनचा भगवा फडकवावा असे हिंदुह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न साकार करण्याची वेळ आता आली आहे” असे प्रतिपादन तालुका प्रमुख शिंदे यांनी यावेळी बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिकांनी ज्या प्रमाणे आघाडी धर्म पालन करत लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य दिले. त्याच प्रमाणे विधानसभेत शिवसेनेच्या मशाली बरोबर ठाम राहतील याचा मला विश्वास आहे.
या दरम्यान माजी तालुकाप्रमुख पोपट जगताप बोलताना म्हणाले की, तालुक्यातील काही पदाधिकारी पक्ष सोडून गेले तरी कडवा शिवसैनिक कोठेही गेला नाही. हे लोकसभा निवडणुकीने दाखवुन दिले आहे. या पुढील काळात पक्ष पुन्हा जोमाने बांधुन सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी आपण सर्व कामास लागु असे अवाहन त्यांनी केले.
तसेच याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे यांनी बोलताना सांगितले की, काही पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महायुती मध्ये गेले परंतु त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकांनी साथ दिली नाही. तो शिवसैनिक आपल्या बरोबर आहे. आता हितून पुढे अधिक जोमाने काम करत आपल्याला प्रत्येक गावामध्ये शाखा स्थापन करायची आहे. शिवसेना, युवा सेना, विद्यार्थी सेना, कामगार सेना, शिव आरोग्य सेना अशा संघटनाच्या शाखा अधिक मजबूत करून आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे.
या दरम्यान पुढे बोलताना युवासेना जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे म्हणाले की, जे गेले त्या बद्दल वारंवार बोलुन उपयोग नाही, चाळीस आमदार व तेरा खासदार जाऊन सुध्दा उध्दवसाहेब ठाकरे डगमगले नाहीत. आपल्या मधुन कोणी गेले याचा विचार न करता निष्ठावंतांच्या जीवावर शिवसेनेची ताकद वाढवुया. भोर विधानसभा शिवसेना लढणार व विजयी देखिल होणार हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना भोर तालुका महिला संघटिका निशा सपकाळ यांनी तालुक्यातील महिला शिवसैनिक देखिल या पुढील लढ्यात मागे राहणार नाहीत अशी ग्वाही दिली. तसेच यावेळी भोर विधानसभेसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडुन तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांचे नाव इच्छुक म्हणुन घोषित करण्यात आले.
या मेळाव्या प्रसंगी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, माजी तालुकाप्रमुख पोपटकाका जगताप, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, तालुका महिला संघटिका निशा सपकाळ, तालुका उपसंघटिका प्रिया मांढरे, युवासेना जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे, जिल्हासचिव रोहीदास कोंडे, भोर तालुका समन्वयक भरत साळुंके, महिला आघाडीच्या रुपाली पडवळ, योगेश महाडिक, शिवआरोग्य सेनेचे तालुका समन्वयक शरद जाधव, प्रसिध्दी प्रमुख नितेश चव्हाण, कापुरव्होळेच माजी सरपंच योगेश गाडे, ओंकार झांजले, चांगदेव आवाळे, श्रीकांत लिमण तसेच यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्रसंचालन शरद जाधव यांनी केले तर भरत साळुंखे यांनी अभार मानले.