भोर – निसर्गरम्य हिरडस मावळ खोर्‍यात सात वर्षांतून एकदाच येणारी कारवी फुलली; वनस्पती अभ्यासकांना या वनस्पतीचे विशेष आकर्षण

भोर : सात वर्षांतून एकदाच फुले येणारी कारवी ही वनस्पती भोर तालुक्यातील निसर्गरम्य हिरडस मावळ खोर्‍यात या वर्षी फुललेली पाहायला मिळत आहे. फुललेली कारवी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी गर्दी करीत आहेत. कारवी हे भारताच्या पश्चिम घाटात आढळणारे झुडूप आहे. महाड पंढरपूर रस्त्याच्या हिरडस मावळ परिसरात हिरव्यागार डोंगरावर जांभळ्या रंगाच्या कारवीच्या फुलांचे ताटवे आता दिसू लागले आहेत. या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे कारवी ही वनस्पती सात वर्षांतून एकदाच फुलते. त्यामुळे वनस्पती अभ्यासकांमध्ये या वनस्पतीचे विशेष आकर्षण आणि कुतूहल आहे.

कारवी या वनस्पतीचा जीवनकाळ हा फक्त 8 वर्षांचा असतो. त्यामुळे कारवी आयुष्यात एकदाच फुलते. फुलांनंतर ही वनस्पती फळांनी भरलेली असते, जी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते. पुढील मान्सूनच्या आगमनाने ही फळे जमिनीवर पडतात आणि याचे बियाणे उगविण्यासाठीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. त्यामुळे दर सात वर्षांनी कारवी फुललेली दिसेल. या नंतर आता ही कारवी २०३१ या वर्षामध्ये दिसेल.

कारवी बहुपयोगी
कारवी वनस्पतीचे औषधी उपयोग आहेत. तर याच्या बारीक फांद्या आदिवासी लोक घराचे छप्पर बनविण्यासाठी वापरतात. शेतीकामातही कारवीच्या फांद्यांचा पिकांना आधार देण्यासाठी उपयोग होतो.

Advertisement

कारवी चे मध
कारवी चे मध लहान मुले, वद्धांसाठी आणि महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांना हीमोग्लोबिन समस्या उद्भवत नाही. कारवीचं मध हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अंगाची आग आणि तोंडाला चव येण्यास मदत
कारवी हे थंड आयुर्वेदिक ओषधं आहे. कारवीचे कोंब खाल्ल्यानं अंगाची आग होत असेल तर शातं होण्यास मदत होते. तोंडाला चव नसेल तर कारवी तोंडाला रूची प्रदान करते.

लघवी करताना आग
लघवी करताना आग होत असेल तर कारवीच्या कोंबाची भाजी खावी. यामुळे लघवी करताना होणारी आग थांबते.

कुष्टरोग तसंच खरूजसाठी उपयुक्त
कारवीचा रस घेतल्यास कुष्ठरोग आणि कोणत्याही कारणानं अंगावर उठलेली खरूज बंद होते. तसंच शरीरावरील सूजसुद्धा कारवीचा रस घेतल्यामुळे बरी होते.

जखम बरी होण्यास मदत
जखम पिकून फुटली असेल आणि त्यातून पू वाहून जखम झाली असेल, तर कारवीची मूळं उकडून लावल्यास जखम बरी होते.

शरीरावरील सुजेसाठी फायदेशीर
कारवीची मुळं उगाळून सुजेवर लावल्यास सूज ताबडतोब कमी होते. सुरजेसाठी कारवी रामबाण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page