भोर तालुका खरेदी विक्री संघाला खत विक्रीचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
भोर : भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेच्या वतीने खत विक्री २०२३/२४ चा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन संन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष दत्ताञय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर दुबेपाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपञक देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, उपाध्यक्ष अतुल शेडगे, संचालक विजय शिरवले, सोमनाथ सोमाणी, किशोर बांदल, नरेश चव्हाण, संपत दरेकर नथु साळेकर, बबन गिरे, दत्तात्रय कांबळे, विठ्ठल खोपडे, ज्ञानेश्वर भोसले, बबन जाधव, दत्तात्रय बाठे, वसंत वरखडे, नंदा मोरे, सुजाता जेधे, दिलीप वरे, मधुकर कानडे, नथु दामगुडे, दिवानजी इंगुळकर उपस्थित होते.
भोर तालुका खरेदी विक्री संघाच्या स्थापनेला ६४ वर्ष झाले असुन मागिल अनेक वर्षापासुन माजी मंञी अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य दरात खत विक्री व गोळी खत विक्री केली जाते. राज्यातील इतर खरेदी विक्री संघ डबघाईला आले असताना भोर तालुका खंघाने अत्यंत चांगले काम करुन भोर तालुका खरेदी विक्री संघाने फेडरेशनकडुन खते विकत घेऊन आणी वेळेत पैशाची परतफेड करुन दिल्याबददल सदरचा राज्यस्तरीय २०२३/२४ चा पुरस्कार मिळाला आहे.
राज्यातील इतर संघ डबघाईला आले असताना भोर खंघाने अत्यंत चांगले काम करुन उत्कृष्ट बक्षिस मिळवले त्याबददल आमदार संग्राम थोपटे यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. भोर तालुका खरेदी विक्री संघ येणाऱ्या काळात शेतकऱ्यांकडुन भात खरेदी करुन तांदुळ विक्री करुन इंद्रायणी तांदुळाची प्रसिध्दी करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे व उपाध्यक्ष अतुल शेडगे यांनी सांगितले.