भोर विधानसभेसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारोंच्या उपस्थितीत किरण दगडे पाटील उद्या भरणार उमेदवारी अर्ज

भोर : भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा निवडणुक प्रमुख तसेच माजी नगरसेवक किरण दगडे पाटील हे उद्या सोमवारी(दि. २८ ऑक्टोबर) भोर शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता किरण दगडे पाटील यांच्यावतीने पदयातत्रेला सुरुवात होणार आहे.  ही पदयात्रा राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मैदाना वरून सुरवात होऊन भोर बस स्टॅन्ड वरील श्री छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यांनतर मंगळवार पेठ मार्गे ही पदयात्रा भोर नागरपालिकेपासुन शिवतीर्थ चौपाटीकडे मार्गस्थ होणार असून तेथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा भोर पोलीस स्टेशन समोरुन नवी अळी मार्गे राजवाडा चौकाकडे मार्गस्थ होणार आहे. अशा प्रकारे भोर शहरातून पदयात्रा काढत शक्ती प्रदर्शन करत किरण दगडे पाटील भोर तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.

Advertisement

किरण दगडे पाटील यांची आधुनिक श्रावणबाळ अशी ओळख असून युवामंचच्या माध्यमातून ते गेली ९ वर्ष अनेक विधायक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये भोर-राजगड(वेल्हे)-मुळशीतील नागरिकांसाठी मोफत काशीदर्शन, दिवाळी साहित्य वाटप, महिलांसाठी कोल्हापूर महालक्ष्मी व संत बाळूमामा दर्शन असे अनेक उपक्रम त्यांच्या वतीने राबविण्यात येत आहेत. तसेच भोर-राजगड-मुळशीत केलेली विकास कामे जनतेसमोर ठेवून ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page