राजगड पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई; तब्बल एक कोटींचा अवैध गुटखा जप्त; पोलीस निरीक्षक राजेश गवळी पुन्हा चर्चेत

नसरापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे(ता.भोर) गावच्या हद्दीत राजगड पोलिसांनी आज रविवारी(दि. २७ ऑक्टोबर) पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. यामध्ये अवैध्य गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकसह २ जण ताब्यात घेतले असून एम. एच. ०५ डी. के. ८१६७ असा या ट्रकचा क्रमांक आहे. यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधी पान मसाला व तंबाखू असलेली २०२ पोती असून त्याची किंमत तब्बल एक कोटी ५ लाख ८८ हजार २४० रुपये असुन ट्रकसह एकूण एक कोटी १५ लाख ८८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल राजगड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अक्षय सुभाश नलावडे यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय बातमीदारांमर्फत माहिती मिळाली की अवैध्य गुटखा वाहतूक करणारा एक ट्रक पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे(ता.भोर) गावच्या हद्दीतील राजस्थानी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभा आहे. यांनतर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी वेगाने सूत्र फिरवत पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ जाधव, अक्षय नलावडे, सचिन नरुटे यांच्यासह सदर ठिकाणी धाव घेत ट्रकसह ४ आरोपी ताब्यात घेतले. मल्लमा भिमाया दौडमनी(वय ३१ वर्ष, सध्या रा. कात्रज, मुळ रा. कर्नाटक), तुषार दिपक घोरपडे(वय २६ वर्ष, रा. जांभुळवाडी, कात्रज, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे. यावेळी आरोपींनी सदरचा माल हा स्वप्रील भालषंकर, बबलु पाटील यांना देण्याकरिता घेऊन चालले असल्याचे सांगितल्याने या दोघांवरही राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page