भोर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी २३ उमेदवारांनी केले अर्ज दाखल; कोण आहे इच्छुक ? कोणी भरले उमेदवारी अर्ज ? सविस्तर वाचा
भोर : महाराष्ट्रात विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर केलेल्या तारखेप्रमाणे आज मंगळवार(दि. २९ ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस होता.
यादरम्यान भोर विधानसभा मतदार संघासाठी भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील २३ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या ४ दिवसात एकमेव आमदार संग्राम थोपटेंचा नामनिर्देशन अर्ज आला होता. त्यांनतर सोमवारी(दि. २८ ऑक्टोबर) रोजी चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये किरण दगडे पाटील, बाळासाहेब चांदेरे, जिवन कोंडे व लक्ष्मण रामकुंभार(ता.मुळशी) यांचा समावेश होता.
यांनतर आज मंगळवारी(दि. २९ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी तब्बल १८ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये कुलदीप कोंडे(ता.भोर), रणजीत शिवतरे(ता.भोर), शंकर मांडेकर (ता.मुळशी), स्वरूपा थोपटे(ता.भोर), पियुषा दगडे(ता.मुळशी), शरद ढमाले (ता.मुळशी), समीर पायगुडे(ता.भोर), संजय भेलके(ता.भोर), अभिषेक वैराट (ता.राजगड), पांडुरंग मरगळे(ता.मुळशी), सचिन देशमुख(ता.भोर), अनिल जगताप(ता.राजगड), राहुल पवार(ता.भोर), सूर्यकांत माने(ता. राजगड), रामचंद्र जानकर(ता.राजगड), अनिल सपकाळ(ता.राजगड), प्रमोद बलकवडे (ता.मुळशी), दिनकर शेडगे (ता.मुळशी) यांचा समावेश आहे. या उमेदवारी अर्जांमध्ये किती अर्ज छाननी मध्ये बाद होणार? निवडणुकीत किती जण माघार घेणार? आणि या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात किती जण रिंगणात असणार? हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.