अद्यावत शिक्षणासाठी विज्ञान प्रयोगशाळा महत्त्वाची; खानापूर विद्यालयात उद्घाटन प्रसंगी मा. आ. संग्राम थोपटे यांचे प्रतिपादन
भोर : सध्या विज्ञानाचे युग असून या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अद्यावत शिक्षण घेणे गरजेचे आहे. विज्ञानामुळे विविध प्रकारची संशोधने होत असतात. यासाठी विज्ञान प्रयोगशाळेचे योगदान मोलाचे ठरते. म्हणूनच अद्यावत शिक्षणासाठी विज्ञान प्रयोगशाळा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन खानापूर विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
राजगड ज्ञानपीठ संचालित सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व ज्युनियर कॉलेज खानापूर(ता.भोर) येथे रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर शाखा यांच्याकडून विज्ञान प्रयोगशाळा विद्यालयाला देण्यात आली. या विज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संग्राम थोपटे बोलत होते.
याप्रसंगी युवा उद्योजक अनिल सावले, उत्तम थोपटे, रोटरी अध्यक्ष अनिरुद्ध जोशी, सत्यनारायण काब्रा, नितीन जोशी, सुश्रुत सरदेसाई, विलास शेटे, अतुल किंद्रे, विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, सरपंच मंगल गायकवाड, राधिका रवळेकर, वैशाली पवार, संपत दरेकर, माजी सरपंच चंद्रकांत नांगरे, आर.एन.थोपटे, रोटरीयन सुनील थोपटे, जयवंत थोपटे आदींसह विसगाव खोऱ्यातील नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा मिळावी. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांनी राजगड ज्ञानपीठाची स्थापना करून दुर्गम डोंगरी भागात अनेक विद्यालय उभी केली. खानापूर विद्यालयाला देण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळा यात रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांचे मोठे योगदान आहे. भोर तालुक्यात मोफत डायलिसिस केंद्र उभरण्याचा माणसं आहे. डायलिसिस केंद्र लवकरच उभारले जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.