दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभूमीत भरवण्यात आलेल्या भव्य किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
कापूरहोळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभूमी मध्ये दिवाळी निमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार(दि. २४ नोव्हेंबर) रोजी विठ्ठल मंदिर या ठिकाणी पार पडला. या स्पर्धेत एकूण ३५ किल्ले बनवण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थ मंडळ कापूरहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या आयोजनात मुख्यतः सागर गाडे, अमर गाडे, गजानन गाडे, सई गाडे यांचा सहभाग होता. या स्पर्धेचे एकूण ५ क्रमांक काढण्यात आले.
त्यामधे यश मच्छिंद्र अहिरे याने बनवलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. तसेच किल्ले पुरंदर बनवणाऱ्या मयुरी अमित गाडे व गणेश पांडुरंग गाडे यांस द्वितीय क्रमांक चे बक्षीस देण्यात आले. यांनतर तृतीय क्रमांकाचे बक्षीस पायल प्रकाश गाडे यांनी बनवलेला किल्ला मल्हारगड यांस देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पौर्णिमा शंकर देवघरे व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस श्रवण गणेश गाडे यांस देण्यात आले. हा बक्षीस वितरण समारंभ सुदाम गाडे, चंद्रकांत गाडे, अमृत गाडे, मच्छिंद्र अहिरे, अमित गाडे, प्रवीण देवघरे अक्षय गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.