३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरीत पीएसआय रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात
मुख्य संपादक : दिपक महांगरे
पिंपरी चिंचवड : पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पिंपरीत पोलीस उपनिरीक्षकाला तडजोडीअंती ३० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८ वर्ष) असे रंगेहात पकडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पिंपरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या मोहननगर पोलिस चौकी येथे मंगळवारी (दि.१५ एप्रिल) केली आहे.नीलेश रमेश बोकेफोडे (वय ३८ वर्ष) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ एप्रिल रोजी तक्रार केली होती.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तक्रारदाराचे वाहन एका गुन्ह्यात पोलिसांनी जप्त केले. ते वाहन सोडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक नीलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र त्यानंतर तडजोडीअंती ३० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. त्यावेळी उपनिरीक्षक बोकेफोडे यांना ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.