भोर नगरपालिकेच्या करवाढी विरोधात भोरकरांचा मोर्चा…

भोर : भोर नगरपालिका प्रशासनाने चतुर्थ वार्षिक कर आकरणीमध्ये तब्बल २५ टक्के दरवाढ केल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी निषेध करून गुरुवार (दि.१२ ऑक्टबर) रोजी सकाळी १० वाजता भोर एस.टी. स्टँड ते भोर नगरपालिका कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केला आहे.
नवीन कर आकारणी न करता जुन्याच दराने कर आकारणी करावी असे सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांना निवेदन दिले आहे.
यावेळी भोर शहरातील माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,राजेश शिंदे, कुणाल धुमाळ, पोपट तारू,प्रमोद कुलकर्णी, सचिन मांडके ,पंकज खुर्द,
आप्पा सोनवले,स्वातीताई गांधी,दिपालिताई शेटे,हसिनाताई शेख,केदार देशपांडे,राजेश गुरव,सुरेश कांबळे,कपिल दुसंगे उपस्थित होते.
नगरपालिकेने २९ जून रोजी करामध्ये सरसकट १० टक्के दरवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
नगरपालिका प्रशासनाने २५ टक्के सर्वसाधरण कर, १ टक्के अग्निशामक कर, निवासी मालमत्तेसाठी ६ टक्के शिक्षण कर लादलेला आहे. याव्यतिरिक्त निवासी मालमत्तेसाठी ३६० रुपये आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी ५४० रुपये कर लादलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मालमत्तेला सुमारे ३३ टक्के ते ३५ टक्के कर नगरपालिकेला द्यावा लागणार आहे.
ही करवाढ एकदा लागू झाली आणि त्याचा विरोध करून रद्द झाली नाही तर आयुष्यभर हा अण्यायकारक कर भोर वासियांवर बसणार आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भोर नगरपरिषदेच्या प्रशासनाविरोधात हा मोर्चा गुरुवार (दि.१२ ऑक्टबर) सकाळी १० वाजता भोर एस.टि. स्टँड येथून आयोजित केला आहे.
याबाबत भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी सांगितले की नगरपालिकेच्या करवाढीतील तक्रारी संदर्भात निवारण करण्यासाठी नगरपालिकेच्या कर विभागात तक्रार निवारण कक्ष तयार करण्यात आला आहे. तेथे नागरिकांना करांबाबतची योग्य माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी संबंधित कक्षात जाऊन आपल्या तक्रारीचे निवारण करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page