भोर तालुक्यात चोरीचे सत्र कायम…
भोर न्यूज : संगमनेर(ता.भोर. जि.पुणे) गावच्या हद्दीतील जमीन गट क्रमांक ५२८ मध्ये शेतीसाठी बसवलेला एक काळया रंगाचा गोलाकार आकाराचा १६ एम एम चा पॉलीटॅब जेन कंपनीचा ठिबक सिंचन साठी लागणारा ६००० मीटर लांबीचा पाईप चोरी झाल्याची घटना बुधवार (दि.११) रोजी रात्री घडली. याबाबत फिर्यादी अभिजीत आनंदा गोळे (वय ३९) राहणार नऱ्हे, ता.भोर. जि.पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशन अंकित किकवी चौकीत तक्रार दिली आहे. अभिजीत गोळे यांची वडिलोपार्जित जमीन संगमनेर ता.भोर.जि.पुणे येथे आहे. ते गोदरेज कंपनी(विंग) येथे कंपनीत कामास कार्यरत आहेत. गुरुवार (दि.१२) रोजी ते कंपनी वरून घरी येत असताना शेतात थांबले असता पाईप चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत किकवी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक जाधव यांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.द.वि. कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चोरी झालेल्या पाईप ची एकूण किंमत ३०,००० रुपये इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक गणेश लडकत करीत आहेत.