सासवड-हडपसर रोडवरील गादी कारखान्यास आग…
सासवड : आज शनिवार (दि.१४) रोजी सायंकळ च्या सुमारास सासवड-हडपसर परिसरातील वडकी गावाच्या हद्दीतील एका गाडी कारखान्यास आग लागली. गादी कारखान्यातून धूर येत असल्यामुळे ग्रामस्थांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी याबाबत ची माहिती पुणे येथील अग्निशामक दलाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामक दलाचे सात बंब घटना स्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने कारखान्यात जीवितहानी झाली नाही. या आगीत कारखान्यातील गाद्या,कापूस जळल्या असल्याची माहिती कंपनीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी दिली.