भोर तालुक्यातील नसरापूर गावच्या अंकिता इंगुळकरची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

कापूरहोळ प्रतिनिधी :पुण्यातील बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथील नसरापूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे जिल्हास्तरीय शासकीय मैदानी स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये १९ वर्ष वयोगटाखालील मुली १०० मिटर,२०० मीटर आणि ४०० मीटर धावणे या तीनही क्रीडा प्रकारात विद्यालयातील कामथडी गावची अंकिता लक्ष्मण इंगुळकर आणि लांब उडी मध्ये संस्कृती संदीप वाल्हेकर या दोघींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची विभागीय पातळी निवड झालेली आहे. या स्पर्धेसाठी कामथडी गावचे युवा सरपंच नितीन दादा इंगुळकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.जिल्हास्तरीय शासकीय स्पर्धेत लांब उडी, धावणे, भाला फेक, गोळा फेक, इत्यादी क्रीडा प्रकारात १४ ते १९ वर्ष वयोगटातील तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेत घवघवीत यश मिळवले.१५०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात यश गोवर्धन महाले आणि तानिया सुनील पवार यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
यावेळी विद्यालयातील प्राचार्य एस वाय शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षक ए. आर.खोपडे, विभाग प्रमुख वाय. एम. मिसाळ, धेंडे, प्रा. सतीश पुणेकर आणि बिबवे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page