तरंगत्या दवाखान्याद्वारे भाटघर धरण क्षेत्रात वैद्यकीय सेवा…अतिदुर्गम भागासाठी लाँच उपलब्धता

भोर : भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली असून ही सेवा पाऊस काळात बंद असते.आठवड्यातून या सेवेसाठी बुधवार व शुक्रवार असे दोन दिवस ठरवण्यात आले आहेत.

Advertisement

भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही,भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातच ती सुरू होते.पाऊस काळात बंद असलेल्या लाँचची दुरुस्ती आता करण्यात आली असून आता नागरिकांवर उपचार करण्यात येणार आहेत. या सेवेचा फायदा चांदावणे, गुहिणी, खुलशी, भूतोडे, डेरे, भाइवली, मळे- सुतारवाडी, बुरूडमळा, नानावळे, सांगवी वेखो, वाघाची, गोपे, घुमवस्ती आणि कुंबळे या गावांना होणार आहे या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page