वेळू (ता.भोर) येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उद्घाटन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…
खेडशिवापूर: गुरुवार (दि.१९) रोजी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र याचा उद्घाटन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने दिल्लीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाचे वेळूमध्ये व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून स्क्रीनद्वारे दाखविण्यात आले. थेट प्रक्षेपणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
स्क्रीनद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या योगदानमध्ये नरेंद्र मोदी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगत रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कुशल महाराष्ट्र, रोजगार मुक्त महाराष्ट्र आदी बाबीचे महत्व वर्तविले. यावेळी उपस्थित टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी मुग्धा स्कील कौशल्य पथकाने स्क्रीनचे व्यवस्था केली होती.
शिवसेना शिंदे गट, भाजपचे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने कौशल्य विकासाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रम गुरुवार ( दि. १९ ) रोजी शेतकरीवाडा वेळु ( ता. भोर ) येथे पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भोर तालुका भाजप अध्यक्ष जीवन कोंडे, उपजिल्हाध्यक्ष भाजप बाळासाहेब गरुड, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारेे, वेळूचे माजी सरपंच शिवाजी वाडकर, अरविंद शिंदे, अण्णासाहेब शिंदे,
दिपक करजांवने, पुनम पांगारे, तसेच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते.