राजगड सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ५० हजार रुपये किंमतीच्या किलोस्कर कंपनीच्या १० मोटरींची चोरी; गुन्हा दाखल
कापूरहोळ : राजगड पोलिस स्टेशन येथे रात्री शुक्रवारी (दि.१०) उशिरा १२ च्या दरम्यान मोटरींच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राजगड सहकारी साखर करखाण्याचे सुरक्षा रक्षक गोपीचंद गनपत आवाळे (वय ४८ वर्षे) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे निगडे अनंतनगर,ता. भोर, जि. पुणे येथील राजगड सहकारी साखर कारखाना येथुन इलेक्ट्रीक विभागात ठेवलेल्या किर्लोस्कर कंपनीच्या एकून १० इन्सुलेशन मोटरी व कारखाण्याने थकीत बाकी असलेमुळे दोन ट्रॅक्टर ओढुन आनले होते. ते कारखाण्याचे आत मध लावले होते. त्याच्या एक्साईड कंपनीच्या दोन बॅट-या, असा एकुन ५० हजार रुपये किमतीचा माल दि.११ एप्रिल ते दि.८ नोव्हेंबर यादरम्यान चोरीस गेला असल्याची अज्ञात चोरटया विरुदध तक्रार फिर्यादी आवाळे यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे दिली आहे. यासंदर्भात अज्ञात चोरटया विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार नाना मदने करीत आहेत.