भोर येथील किकवी तलाठी कार्यालयाचा अजब कारभार… बोर्डही गायब आणि तलाठी ही गायब…
किकवी: किकवी तलाठी कार्यालया बाबत गेल्या काही दिवसांपासून परिसरात अशी चर्चा चालू आहे की तेथे कोणताही शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही.त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याची माहिती निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ला मिळाली. या गोष्टीची सत्यता पडताळ्यासाठी आमच्या टीम ने स्वतः तिथे भेट दिली असता. तिथे प्रथमदर्शी असे निदर्शनास आले की हे नक्की तलाठी कार्यालय च आहे का? असा आमच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.याचे कारण असे की येथे तलाठी कार्यालय आहे असा या तलाठी कार्यालयाला कोणत्याही प्रकार चा बोर्ड लावलेला नाही.तसेच कोणताही नोटीस बोर्ड नाही. खूप लोक तलाठी कार्यालयाचा टाळा पाहून निराशेने परत जात असल्याचे दिसत होते.
याबत सध्या कार्यान्वित असलेले किकवी मधील तलाठी परमेश्वर जाधव यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी कौटुंबिक दवाखान्याची सबब दिली त्यामुळे मी मागील मंगळवार पासून रजेवर आहे असे सांगितले. त्यामुळे मी कामावर नाही. परंतु याचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम चालू असून सुद्धा सर्व कामे बाजूला ठेऊन शासकीय कामासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घेतली असता तलाठी कार्यालय बंद असल्याने त्यांच्या हाती निराशा येत आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. तलाठी रजेवर असल्यावर वरिष्ठ मंडल अधिकाऱ्यांनी नागरिकांची सोय करायला हवी होती असे नागरिकांचे मत होते.यासंदर्भात वरिष्ठ मंडल अधिकारी,कापूरहोळ पांडुरंग लहारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, किकवी शाखेतील तलाठी परमेश्वर जाधव हे रजेवर असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरता सेवेचा चार्ज सारोळ्यातील तलाठी माधव केंद्रे यांच्याकडे दिला असल्याचे सांगितले. परंतु सत्यता पडताळण्यासाठी सारोळा येथील तलाठींशी संपर्क साधला असता. माझ्याकडे सारोळा आणि भोंगवली हा चार्ज आहे. किकवी शाखेचा चार्ज माझ्याकडे नाही. तशा आशयाचे कोणतेही पत्र त्यांच्याकडे नाही.
किकवी तलाठी कार्यालयाच्या या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या खाली येणाऱ्या केंजळ, काळेवाडी,मोरवाडी,वागजवाडी, लोखरेवाडी येथील नागरिकांनची प्रचंड गैरसोय होत आहे. यावर शेतकर्यांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित केला आहे. तरी लवकरात लवकर वरिष्ठ मंडल अधिकारी,कापूरहोळ यांनी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी नागरिकांची विनंती आहे.