पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांची फोडली गाडी, नेमकं काय घडले? वाचा सविस्तर
पुणे(प्रतिनिधी) : पुण्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या प्रयत्नातही होते. भाजप कार्यकर्ते सभागृहात जाऊन बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढली होती. तर कार्यकर्त्यांनी आपण विचार ऐकायला आलो असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर निदर्शने केली होती. त्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.