धक्कादायक! भोर तालुक्यातील बाजारवाडी येथे साथीच्या आजाराने दोन म्हशींचा मृत्यू…
भोर:भोर तालुकयातील शेतकरी शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय करीत असतात. सध्या भोर तालुक्यातील बाजारवाडी परिसरात पाच ते सहा जनावरे साथीच्या आजाराने(एमडीसी लाल डोळ्यांचा ताप)त्रस्त होती. त्यांच्यावर खाजगी तसेच शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार केले गेले असून सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र बाजारवाडी येथील शेतकरी चंद्रकांत विष्णू खोपडे व शंकर रामचंद्र शिंदे यांच्या म्हशी या आजाराने(एमडीसी लाल डोळ्यांचा ताप)दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे प्रत्येकी ५० हजाराहून अधिक नुकसान झाले. दूध देणारी जनावरे आजारी पडून मृत्यू होत असल्याने धावडी, नेरे, वरवडी परिसरातील शेतकरी चींताग्रस्त आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.