धक्कादायक! बारामती हद्दीत विमान कोसळले…
बारामती : रविवार(दि.२२) आज रोजी रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेचे विमान बारामतीतील बाऊली कंपनीच्या नजीक कटफळ हद्दीत एका शेतात कोसळले. विमानांचे प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीचे शिकाऊ विमान आज पुन्हा एकदा बारामती हद्दीत कोसळल्याने बारामती करांची चिंता वाढली वाढली आहे. चार पाच दिवसांपूर्वीच याच कंपनीचे विमान बारामती हद्दीत कोसळले होते. यात शक्ती सिंग नावाचा पायलट किरकोळ जखमी झाला होता, तर विमानाचे पूर्ण नुकसान झाले होते.आज पुन्हा सकाळी ही घटना घडली आहे. ज्या ठिकाणी पाहिले विमान कोसळले होते त्या ठिकाणी काही वेळापूर्वीच रेल्वे गेली होती या गंभीर घटनांचे दखल केंद्रीय विमान प्राधिकरणाने घेण्याची आवश्यकता आहे. हे विमान कशामुळे कोसळले याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र सातत्याने बारामतीमध्ये विमाने का कोसळत आहेत? हा प्रश्न बारामतीकर उपस्थित करत आहे. या मुळे परिसरतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.