भोर तालुक्यातील किकवी येथील विद्यालयात रंगला भोंडला आणि दांडियाचा कार्यक्रम…
कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार
भोर : भोर तालुक्यातील पश्चिमेकडील किकवी शिक्षण संस्थांच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे मुख्याध्यापक आणि संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांच्या मार्गदर्शनाने भोंडला व दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊतसर यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. देवीच्या विविध गाण्यावरती विद्यार्थी व शिक्षकांनी दांडिया मध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी ३१५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी कौतुक केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी विशेष सहकार्य केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.