राजगड चालू होणारच! आम्ही मैदान सोडून पळून जाणाऱ्यातले नाही – आमदार संग्राम थोपटे.
भोर : शनिवार (दि.२१) रोजी राजगड सहकारी साखर कारखान्यावर जे निवेदन देण्यात आले.त्यानिमित्ताने आज रविवार (दि.२२) रोजी कारखान्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली. कारखान्याच्या आत्ताच्या अवस्थेला चेअरमन व संचालक जबाबदार असल्याचे आमदार संग्राम थोपटेंनी सांगितले. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत असे त्यांनी सांगितले. कालचा प्रकार हा नाहक हव्यासापोटी केलेला आहे.गाळप हंगाम सुरू होणार च ही काळया दगडावरची पांढरी रेश असल्यांचे त्यांनी सांगितले.कर्मचाऱ्यांचे पगार आणि काही बाकी देणी लवकरच दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी गळीत हंगाम राजगड कारखाना लवकरच चालू करणार असून सर्व सभासद व ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत गाळप केला जाणार आहे. काल केलेल्या सर्व आरोपावरुन या मंडळींची स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची धडपड सुरु असल्याचे जाणवते. जनतेची व सभासदांची दिशाभूल करून केवळ द्वेषात्मक राजकारण मनात धरून स्वतः प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी सदरचे निवेदन देण्याचा केविलवाना प्रयत्न झालेला असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.मी हयात असे पर्यंत कारखाना विक्री होऊन देणार नाही. ऊसतोड मजूर हे दिवाळी झाल्यावर च कामावर रुजू होतात.त्यामुळे त्यानंतर कारखाना सुरू होण्याचे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले. कारखान्याच्या क्षमतेत वाढ करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी पोपटराव सुके,सुभाष कोंढाळकर,उत्तम थोपटे, सुधीर खोपडे,अरविंद सोंडकर,किसनराव सोनवणे, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी कोंडे,विकासराव कोंडे,दिनकर धरपाळे, प्रताप शिळीमकर,सुरेखाताई निगडे,अशोक कोंडीबा शेलार,संदीप नगीने,कार्यकारी संचालक एस के पाटील व अधिकारी उपस्थित होते.