राजगड सहकारी साखर कारखान्या बाबतीत शिवसेना(उ.बा.ठा.)जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांची पुन्हा एकदा पत्रकार परिषद…दिवाळी अगोदर सर्व देणी देऊन गळीत हंगाम चालू न केल्यास तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा…
भोर : राजगड सहकारी साखर कारखान्या संदर्भात आज दि.२५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा शिवसेना पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी कापूरहोळ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी बोलताना कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळावर जोरदार टीका केली.या वेळेस ते बोलले की राजगड सहकारी साखर कारखाना हा तुमच्या वैयक्तिक राजकीय हेतू मुळे अडचणीत आलेला आहे. कारखान्यचा वापर सातत्याने फक्त राजकीय हेतूसाठी केला जातो त्यामुळेच कोणतीही बँक कर्ज देण्यास अनुकूल नाही.संचालक मंडळाच्या नाकर्ते पणामुळे आम्हाला कारखान्यावर यावे लागते.राजगड सहकारी साखर कारखाना चालवत असताना झालेल्या चुकांवर पडदा टाकण्यासाठी “मीच सर्व केले आहे, या परिस्थिती साठी मीच जबाबदार आहे.” असे सांगून कारखान्याच्या मालमत्तेस धक्का लागू देणार नाही व शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देणार असे बोलणे म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेले भावनिक राजकारण आहे. कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज, निघालेला निलाव कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नसताना केवळ राजकीय निवडणुका पुरती दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे.”मी स्वताची मालमत्ता तारान ठेवली आहे” असे सांगून सामान्य शेतकरी, कामगार यांना भावनिक करून वारंवार चालणारा वेळकाढूपणा थांबवा व सत्याला सामोरे जाऊन गरीब शेतकरी, कामगारांची देणी द्या, असे ते या वेळेस बोलले.
कुलदीप कोंडे या वेळेस बोलले की आपल्याला जर वाटत असेल आम्ही कारखान्यासाठी काय केले तर गेली २५ वर्ष मिळेल त्या भावात कोणतीही तक्रार न करता कारखान्याला ऊस घातला आहे. आम्ही राजकारण करत असताना कोणताही द्वेष मनात न ठेवता खिलाडू वृत्ती ने सामोरे जातो आहे हे आपण जानतेने पाहिले आहे.
कारखाना चांगल्या प्रकारे चालवल्यास आम्ही स्वतः शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी दारोदार फिरू. शेतकरी, कामगार, व्यापारी यांची देणी देऊन कारखाना दिवाळी अगोदर चालू केल्यास आम्ही सर्व मिळून संचालक मंडळाचा हार तुरे नारळ देऊन सत्कार करू. अन्यथा दिवाळीच्या अगोदर सर्व देणी देऊन गळीत हंगाम चालू न केल्यास आम्ही तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी या वेळेस सांगितले.