स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत आंबवडे येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
भोर : तालुक्यातील आंबवडे येथील श्री नागेश्वर विद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयातील माजी विद्यार्थी आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ४० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यामध्ये विशेषतः सन २००२-०३ सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यामध्ये आश्विनी मांगडे-देवघरे, मंदाकिनी कुडले-नांगरे, निलेश देवघरे, माधव जेधे, संतोष गाडे, पृथ्वीराज ढुमे, शंकर चिकणे, दिपक भडाळे, अश्विन खोपडे, समीर मोरे, संदिप दौंड, ज्ञानेश्वर शेडगे, दिपक घोरपडे, प्रशांत जगताप, हनुमंत धुमाळ, विशाल मानकुंबरे, मयुर जेधे, दिपक घोरपडे, सदिप शेडगे यांचा सहभाग आहे. याप्रसंगी नागेश्वर विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच प्रतीक वाळांजकर, पंकज मानकुबरे, रामदास भडाळे, युवराज जेधे नितीन कुडले संदिप खाटपे व पंचक्रोशीतले मान्यवर उपस्थित होते.