दोन लाख रुपये किमतीचे १५ मोबाईल चोरल्याप्रकरणी दोघांना अटक,भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई…
पुणे : कात्रज तलावाच्या बाजूला २ व्यक्ती मोबाईल विकत असल्याची माहिती भरती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरीचे फोन विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या बॅगेत १५ मोबाईल सापडले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली देत कात्रज, गोकुळनगर, कोंढवा परिसरातून फोन चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
महादेव शेलार(वय १८वर्षे) आणि प्रेम राजू शेलार (वय २०वर्षे, दोघेही मूळचे पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रत्येक वेळी भेटल्यावर वेगवेगळे मोबाईल दाखवून मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी दोन लाख रुपये किमतीचे १५ मोबाईल चोरले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.