शिवसेना (उ.बा.ठा.) पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांचा पक्षपदाचा राजीनामा
भोर : उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी आज सोमवार (३० ऑक्टोबर) रोजी पक्षपदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांच्याकडे दिला असल्याचे सोशल मीडियावर झळकत आहे..
आपण केवळ पक्षाचापदाचा राजीनामा दिला असून मी ठाकरे गट शिवसेना पक्ष सोडला नसल्याचे कोंडे यांनी सांगितले.
कुलदीप कोंडे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी ज्या सामजिक भावनेतून राजकारणात आलो ती म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करता यावी व त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळून देता यावा, परंतु गेली अनेक वर्ष ज्या समाजाने मला मानसन्मान दिला, तो माझा मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. आज सामान्य मराठा हे नेते यांना गावबंदी, सामाजिक कार्यक्रमात बंदी घालत आहे. ज्या समाजाने एवढा मानसन्मान दिला तोच समाज आपल्याकडे हीन भावनेतून पाहत आहे. समाजातील जागरूक नागरिक म्हणून सर्व सामान्य समाजाप्रती आदर राखून मराठा आरक्षणाच्या लढ्यात सामील होता यावे व मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे, या लढ्याला पाठींबा म्हणून मी आपल्या शिवसेना पक्षाच्या पुणे जिल्हा संघटकपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण त्याचा स्वीकार करावा अशी विनंती राजीनामा पत्रकात म्हटले आहे