राजगड सहकारी साखर कारखाना लवकरच चालू होणार! आजपासून सर्व कर्मचारी कामावर रुजू

भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार संग्रामदादा थोपटे व सर्व संचालक मंडळ आणि राजगड कामगार संघटना यांच्यामध्ये दिनांक २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या चर्चेप्रमाणे गळीत हंगाम २०२३-२४ सुरु करण्यासाठी मशिनरी मेंटेनन्स करून पूर्वतयारीसाठी सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. सदर प्रसंगी कामावर उपस्थित झालेल्या सर्व कर्मचान्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कामगारांचे वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रतापराव रंगराव पाटील यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२३-२४ साठी मागील ३ ते ४ महिन्यांपासून कारखान्याचे चेअरमन आमदार संग्रामदादा थोपटे साहेब व सर्व संचालक मंडळ हे कारखाना सुरु ठेवण्यासाठी राज्य शासन, बँका व आर्थिक संस्था यांच्याकडे सतत पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्याचे ठरविलेले असून शासन हमीवरील कर्ज मिळण्याचे दृष्टीने देखील कारखान्याने प्रस्ताव सादर केलेला असून शासन दरबारी लवकरच मंजुर होवून कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

Advertisement

शासनाचे उपलब्ध निधीमधून शेतक-याचे उर्वरीत उसाचे पेमेंट, तोडणी वाहतुक बील, कर्मचारी पगार, वीज बील, बँकाची तडजोडीच्या रक्कमा इत्यादी जुनी देणी भगवून हंगाम २०२३-२४ साठी मशिनरी देखभाल दुरुस्ती करून सर्व कामगारांना कामावर हजर होवून मशिनरी दुरुस्ती करून घेवून लवकरच बॉयलर पुजन व १० ते १२ दिवसांत गळीत हंगाम सुरु करीत आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

कारखाना संचालक मंडळाने हंगाम २०२३-२४ साठी २,००,००० मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून २३२१ हेक्टर आर उस क्षेत्राची नोंद केली आहे. त्यापासून १,६२,००० मे. टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेटकेन क्षेत्रातून ३८,००० मे. टन असे एकूण २,००,००० में टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा ट्रक, ट्रैक्टर, बैलगाड़ी अशी एकूण २००० प्रतिदिन गाळप होईल असे नियोजन केलेले आहे. लवकरच गाळम हंगाम सुरु करीत आहे तरी सर्व शेतकरी सभासद बंधूनी आपला ऊस राजगड कारखान्यास देवून सहकार्य करावे अशी माहीती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page