पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? पुणे आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; आवश्यक कागदपत्रे व तुमच्या भागातील दौऱ्याची तारीख पहा
पुणे : पक्की अनुज्ञप्ती अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये भोर, राजगड(वेल्हा), सासवड जेजुरी, उरळीकांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट व शिरुर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी जाहिर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.
खालीलप्रमाणे दिलेल्या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भोर – ८ व २२ जुलै, ५ व २० ऑगस्ट, ९ व २३ सप्टेंबर, ७ व २१ ऑक्टोबर, ७ व १८ नोव्हेंबर आणि ९ व २३ डिसेंबर.
राजगड(वेल्हा) – ३ जुलै, २ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर.
सासवड – १२ व १९ जुलै, ९ व १६ ऑगस्ट, १३ व २० सप्टेंबर, ११ व १८ ऑक्टोबर, ८ व १४ नोव्हेंबर आणि १३ व २० डिसेंबर.
जेजुरी – २६ जुलै, २३ ऑगस्ट, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, २२ नोव्हेंबर आणि २७ डिसेंबर,
उरळीकांचन – ५, १६ व २९ जुलै, ६, १४ व २६ ऑगस्ट, ५, १२ व २५ सप्टेंबर, ८, १४ व २८ ऑक्टोबर, ५, १२ व २५ नोंव्हेंबर आणि ४, १७ व २६ डिसेंबर.
हडपसर – १० जुलै, ८ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १० ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर आणि १२ डिसेंबर.
शिक्रापूर – ९ व २३ जुलै, १२ व २१ ऑगस्ट, १० व २६ सप्टेंबर, १५ व २४ ऑक्टोबर, २० व २८ नोव्हेंबर आणि ५ व २४ डिसेंबर.
पिरंगुट – १८ जुलै, २२ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबर.
शिरूर – ४, १५ व २४ जुलै, ७, १३ व २७ ऑगस्ट, ६, १९ व २४ सप्टेंबर, ९, १७ व २९ ऑक्टोबर, ६, १३ व २७ नोव्हेंबर आणि १०, १९ व ३० डिसेंबर.
अर्ज कसा करावा
शिकाऊ अनुज्ञप्ती काढून ३० दिवस झाल्यानंतर पक्क्या अनुज्ञप्तीच्या वाहन चालविण्याच्या चाचणी परिक्षेकरिता अर्ज करु शकतो.
आवश्यक कागदपत्रे
– नमुना ४ (Form ४)
– शिकाऊ अनुज्ञप्ती
– नजीकच्या कालावधीत काढलेले तीन फोटो.
– वयाचा आणि पत्त्याचा केंद्रिय मोटार वाहन नियम ४ नुसार पुरावा.
– परिवहन संवर्गातील वाहनांकरिता अर्ज केल्यास मोटार ट्रेनिंग स्कूलचे नमुना ५ मधील प्रमाण्पत्र.
– शुल्क्
– ज्या वाहनांवर चाचणी द्यावयाची त्या वाहनांची सर्व वैध कागदपत्रे.
चाचणी परिक्षा
वाहनचालक चाचणी यशस्वीरित्या पार केल्यानंतर चालकास परवाना दिला जाईल. जर चालक वाहनचालक चाचणी पास करू शकला नाही तर तो सात दिवसांच्या कालावधी नंतर पुन्हा प्रयत्न करू शकतो.