राजगड चा गळीत हंगाम केव्हा सुरू होणार?… या संदर्भात शेतकऱ्यांनी घेतली पत्रकार परिषद…
भोर: शनिवार (दि.२१) आज रोजी राजगड सहकारी साखर कारखाना अनंतनगर, निगडे येथे शेतकऱ्यांच्या वतीने विविध प्रश्न उपस्थित करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली.
राजगड कारखाना रोडवरच भारतीय बैठक घेत.कारखाना प्रशासनावर प्रश्नांचा वर्षाव करत कारखाना सुरू होणार का ,कामगारांचे पगार मिळणार का,कामगारांच्या भविष्याची तरतूद काय.असे अनेक प्रश्न उपस्थित करत १५ दिवसांमध्ये जर प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर मोठ्या आंदोलनाला कारखाना प्रशासन,संचालक मंडळ यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये कुलदीप कोंडे यांनी दिला.पत्रकार परिषद चालू असताना तिथे कार्यकारी संचालक एस.के.पाटील उपस्थित असल्यामुळे त्यांना पुढील १५ दिवसांच्या मुदतीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.त्या ठिकाणी शिवसेना संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे,वैभव धाडवे पाटील,आदित्य बोरगे,अमित गाडे पाटील,किशोर बारणे,प्रशांत दानवले,संतोष लेकावळे,संदीप चिकणे, तसेच इतर शेतकरी,सभासद उपस्थित होते.या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के यांच्या निरीक्षणाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.